जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली
असून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर करण्यात येतोय.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
अशातच नोटबंदी केली असताना 1 कोटींची कॅश आली कुठून?, असा सवाल शरद पवार गटातील
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाहीतर नक्की महिलेने पैसे मागितले का?
की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय.
‘1 कोटींची कॅश देणाऱ्याकडे आली कुठून? या देशाने आणि याच डबल इंजिन सरकारने
नोटबंदी केली तर 1 कोटी रूपयांची कॅश आली कुठून? हाच मोठा प्रश्न आहे’,
असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, नक्की महिलेने ते 1 कोटी रूपये पैसे मागितले का?
की हा सरकारचा खोटानाटा खेळ आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शंका उपस्थित केली आहे.
तर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.