सलमान खानच्या फिल्मच्या सेटवर ‘या’ अभिनेत्रीला मिळायची घाणेरडी वागणूक; कित्येक वर्ष मनात ठेवल्यानंतर अखेर सोडलं मौन

सलमान खानच्या फिल्मच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला मिळायची घाणेरडी वागणूक; कित्येक वर्ष मनात ठेवल्यानंतर अखेर सोडलं मौन

Bollywood Kissa: दिया मिर्झानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.

आजही दिया आपल्या सौंदर्यानं भल्याभल्या अभिनेत्रींसमोर पुरून उरते.

आजही तिचे अनेक चाहते आहेत.चाळीशी ओलांडलेली दिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते.

Related News

तिच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. रेहना है तेरे दिल में मुळे दियाला ओळख मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

दियानं तिच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट केले. पण, तिला एका चित्रपटाच्या सेटवर अत्यंत वाईट अनुभव आला.

दियानं ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटातून सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली. पण,

याच चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहेआज दिया मिर्झाचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

2000 मध्ये फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल

हा किताब जिंकल्यानंतर दिया मिर्झानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.दिया मिर्झानं तिच्या पहिल्याच चित्रपटानं धुमाकूळ घातला.

त्यावेळी सलमान खान चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. दिया मिर्झानं सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ हा चित्रपट केला.

सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

दिया मिर्झाच्या पहिल्याच चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तिच्या अभिनयाची दूजा पसरवली. ती पहिल्यांदाच

‘रहना है तेरे दिन में’ मध्ये रुपेरी पडद्यावर दिसली. ज्यामध्ये ती आर माधवनसोबत दिसली होती.

दियाचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर, तिला सलमान खानसोबत ‘दीवानापन’ आणि नंतर ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटात काम

करण्याची संधी मिळाली.या चित्रपटात ती एका राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसली होती. जे प्रेक्षकांना खूप आवडलं.

पण आता बऱ्याच वर्षांनंतर, अभिनेत्रीनं या चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव शेअर केला. हे जाणून सर्वांना धक्का बसला आहे.

अभिनेत्रीनं सांगितलं की, सेटवर तिच्याशी अजिबात चांगलं वागलं गेलेलं नाही.

चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना दिया म्हणाली की, चित्रपट साईन केल्यानंतर ना कोणतंही वर्कशॉप झालं,

ना रीडिंग. डायलॉग्सही शुटिंगला जाण्याच्या काही वेळ आधीच त्यांना दिले जायचे.अभिनेत्रीनं सांगितलं की,

फिल्ममध्ये त्यांना जे कपडे घालायचे असायचे, तेसुद्धा ट्रायल नं घेता, तसेच शिवले जायचे. यासर्व गोष्टींबाबत जर

ती मेकर्सना काही सांगायची, तर तिला गप्प बसायला सांगितलं जायचं. त्या सेटवर काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट होता,

असं सांगितलं जात आहे.दिया मिर्झाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या

‘नादानियां’ चित्रपटात ती सर्वात शेवटी दिसली. ज्यामध्ये तिच्यासोबत इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर सुद्धा होते.

Read more news here : https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/

 

Related News