शरद पवारांनी विचारलं, विखेंच्या पुढच्या पिढीने काय केलं? सुजय विखेंकडून जोरदार उत्तर

अहमदनगर : ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरीतील सभेत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विखे पाटलांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

‘पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना पाच तास लागतील.’ असा टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे.

Related News

लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून पुन्हा पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार आणि विखे यांच्यात जुनाच राजकीय संघर्ष आहे. या निवडणुकीत त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे. पवार यांनी या मतदारसंघात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. आतार्यंत ते तीन वेळा मतदारसंघात येऊन गेले.

आणखी तीन सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभेत बोलताना राष्ट्रीय मुद्यांसोबतच पवार विखे पाटील यांच्यावर टीका करतात. राहुरीच्या सभेतही त्यांनी विखे पाटील यांच्या परिवारावर टीका केली होती.

Related News