मोठी बातमी : पहिल्या मॅचसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार ठरला, पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार!

मोठी बातमी : पहिल्या मॅचसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार ठरला, पांड्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार!

Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार? याबाबत निर्णय घेण्यात आलाय.

Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईचं 2025 च्या आयपीएलमध्ये

Related News

नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर

पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. (Suryakumar Yadav will lead Mumbai Indians)

इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचा पहिला संघ 23 मार्च रोजी खेळेल. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे.

हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव सक्रीय आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच नेतृत्व करेल, असं सांगण्यात येत होतं.

अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तसं पाहिलं तर सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे, हा मुंबई इंडियन्ससाठी चुकीचा निर्णय असू शकत नाही.

कारण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2023 नंतर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.

त्यातील 17 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. टीमला जिंकवून देण्याच्या टक्केवारीचा विचार केल्यास ती 79.54 इतकी आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

या कारणामुळे तो आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळेच तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारही

असणार नाही आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही तो प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.

या कालावधीत मुंबईच्या संघाने संथ गतीने ओव्हर टाकल्या. त्यामुळे त्याला 3 वेळा दंड ठोठावण्यात आला.

जेव्हा कर्णधार पहिल्यांदा असे करतो तेव्हा त्याला 12 लाखांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा दंड दुप्पट केला जातो आणि तिसऱ्यांदा

असे घडल्यास एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतवरही स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

 

Related News