पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

  राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन

  विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट

  अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता

 प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे

Related News

  लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.

🔹 हल्ल्याचा घटनाक्रम

     विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.
    संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.
     या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे.

🔹 पत्रकार संघटनेची मागणी

  पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  पत्रकारांचा सुरक्षिततेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा.
  अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.

   राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने

   मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.

🔹 निवेदन देताना उपस्थित पत्रकार

    विशाल अग्रे, गणेश वाकोडे, सरफराज अली, सारंग कराडे, स्वप्निल सरकटे, निलेश वानखडे, गोपाल शिरसाट,

    लक्ष्मी गावंडे, महादेव वाघ, सय्यद शकील यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी

    प्रशासन योग्य ती पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related News