पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी

पातूर | प्रतिनिधी

दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर

Related News

19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.

हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला.

या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे.

पत्रकार संघटनेचा संताप

या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांची निष्काळजी भूमिका?

हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता.

मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले.

पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून,

पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निर्भीड पत्रकारितेवर हल्ला?

विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात.

त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे.

त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा!

पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी

अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर

उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार संघटनांच्या प्रमुख मागण्या

हल्लेखोरांना तत्काळ अटक करून “पत्रकार संरक्षण कायदा 2017” आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कठोर कारवाई करावी.

पोलिसांच्या विलंबित प्रतिसादाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

अकोला जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना तातडीने राबवाव्यात.

पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदेशीर संरक्षण देण्यात यावे.

वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात सखोल चौकशी करून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात.

Related News