‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रतिमाची पुन्हा जबरदस्त एण्ट्री

स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशी

प्रेमाचं नाटक करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे.

मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी आणि

Related News

आश्रम केस प्रकरणाचे पुरावे मिळावेत यासाठी अर्जुन प्रियाशी

प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेतो.

मधुभाऊंची सुटका व्हावी यासाठी सायली सुद्धा या नाटकात सहभागी होते.

परंतु, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही आता सायली-अर्जुनच्या मनात

एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना असल्याने या सगळ्या नाटकाचा सायलीला त्रास होऊ लागतो.

अर्जुनने प्रियाला मिठी कशी मारली, तिच्याबरोबर

डान्स कसा केला हा सगळा विचार करून सायली प्रचंड अस्वस्थ होते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात

“मिसेस सायली तुम्हाला हे नाटक करावं लागेल नाहीतर सगळं काही संपेल,

आपल्याला केसचे पुरावे मिळणार नाहीत”

असं अर्जुन सायलीला ओरडून सांगतो.

यावर सायली रडू लागते. बायको रडतेय म्हटल्यावर अर्जुन तिची माफी मागतो.

पण, दुसरीकडे प्रियाला सुद्धा सुभेदारांची सून व्हायचं असतं.

त्यामुळे ती अर्जुनच्या जाळ्यात सहज ओढली जाते.

आता लवकरच प्रिया अर्जुनसाठी डिनर डेटचं प्लॅनिंग करणार आहे.

या कँडल लाइट डिनर डेटवर प्रिया व अर्जुन दोघेच जातात.

मधुभाऊंच्या केससाठी एवढं सगळं करण्याची काय गरज आहे

याचा विचार करून सायली अर्जुनवर संतापते.

मालिकेत हा ट्रॅक चालू असतानाच एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत लवकरच पुन्हा एकदा प्रतिमाची म्हणजे सायलीच्या आईची एन्ट्री होणार आहे.

सायली-अर्जुन एकमेकांशी प्रियामुळे भांडत असताना

समोरून येणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते.

ती पटकन जाऊन त्या बाईला वाचवते.

ही बाई दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते.

तिने चेहरा झाकून घेतलेला असतो. परंतु, सायलीने जीव वाचवल्यावर

प्रतिमा तिचे हात जोडून आभार मानते एवढ्यात सायली तिचा चेहरा पाहते.

महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाचा चेहरा एका बाजूने जळलेला असतो

त्यामुळे सायली तिला पटकन ओळखू शकत नाही.

माघारी फिरत असताना हा चेहरा कुठेतरी पाहिलाय

याची जाणीव सायलीला होते आणि ती जोरात “माई थांबा…”

असा आवाज देते. सायलीने आवाज दिल्यावर प्रतिमा थांबेल का?

सायली तिला ओळखू शकेल का?

या सगळ्या गोष्टी २१ जुलैला प्रसारित होणाऱ्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/janhvi-kapoors-entangled-2-august-audiences-gift/

Related News