घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma )

यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्याची शिफारस केली आहे.

त्यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रममाणात रोख रक्कम सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related News

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा

(Justice Yashwant Varma ) यांची बदली त्यांच्या मूळ अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court)

करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रममाणात रोख

रक्कम सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेनंतर  त्याच्याविरुद्ध चौकशी किंवा महाभियोग चालवण्याचीही चर्चा आहे.

जस्टिस यशवंत वर्मा यांचा जन्म 6 जानेवारी 1969 रोजी झाला आहे.

त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉम (ऑनर्स) केलं.

यानंतर 1992 मध्ये रीवा विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 8 ऑगस्ट 1992 रोजी त्यांनी वकील

म्हणून नोंदणी केली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.

दिवाणी प्रकरणांमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञता आहे आणि संवैधानिक, औद्योगिक वाद, कॉर्पोरेट,

कर आकारणी आणि पर्यावरणीय बाबींशी संबंधित खटले चालवले. 2006 पासून ते उच्च न्यायालयाचे विशेष वकील होते

आणि 2012 मध्ये उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य स्थायी वकील बनले. ऑगस्ट 2013 मध्ये त्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला.

13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची अलाहाबाद हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.

1 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांनी स्थायी न्यायमूर्ती नात्याने शपथ घेतली.

यानंतर 11 ऑक्टोबर 2011 ला त्यांची बदली दिल्ली हायकोर्टात करण्यात आली.

आता सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजिअमने 20 मार्च 2025 ला पुन्हा त्यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मार्च 2024 मध्ये, त्यांनी

आयकर पुनर्मूल्यांकनाविरुद्ध काँग्रेस पक्षाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

याशिवाय, जानेवारी 2023 मध्ये त्यांनी नेटफ्लिक्सच्या ‘ट्रायल बाय फायर’ या वेब सिरीजवर बंदी घालण्यास नकार दिला.

या प्रकरणात, रिअल इस्टेट व्यावसायिक सुशील अन्सल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती,

ज्यावर निकाल देताना न्यायमूर्ती वर्मा म्हणाले होते की, ‘सरकार आणि न्यायालये काही

गोष्टी प्रकाशित करण्याच्या बाजूने नसली तरीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखणं महत्त्वाचं आहे’.

बदलीसाठी शिफारस

अलीकडेच त्यांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागल्यानंतर, तिथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त झाल्याची बातमी आली.

त्यावेळी ते शहराबाहेर होते आणि त्याच्या कुटुंबाने अग्निशमन दलाला फोन केला होता.

रोख रक्कम मिळाल्यानंतर, त्याची नोंद नोंदवण्यात आली आणि मुख्य न्यायाधीशांना त्याबद्दल माहिती देण्यात आली.

यानंतर, कॉलेजियमच्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली. या घडामोडीनंतर, काही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली

की केवळ बदली केल्याने न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होईल, म्हणून चौकशी आणि महाभियोग प्रक्रियेवर देखील चर्चा केली जात आहे.

 

Related News