गणेशोत्सवात फडणवीसांचे मोठे विधान : ट्रम्प टॅरिफवर ‘वॉर रुम’, ठाकरे बंधूंवर खास प्रतिक्रिया

“गणेशोत्सवात फडणवीसांचा ट्रम्पवर पलटवार

मुंबई :गणेशचतुर्थीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

“गणेश हा विघ्नहर्ता आहे, महाराष्ट्रावर व देशावरचं संकट दूर करो,”

अशी प्रार्थना त्यांनी केली.

सुरक्षा व गणेशोत्सव नियोजन

गर्दीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले – “मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आहे.

पोलिस युनिट्स सज्ज आहेत, मंडळांसोबत SOP वर चर्चा व रिहर्सलही पूर्ण झाली आहे.”

ट्रम्प टॅरिफवर फडणवीसांचा ठाम इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% टॅरिफवर मुख्यमंत्री म्हणाले –

“जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा दुसरे मार्ग खुले होतात. आव्हान संधीमध्ये बदलू.”

यासाठीच महाराष्ट्रात ‘वॉर रुम’ उघडण्यात आली आहे.

100 सुधारणा करण्याचं लक्ष्य ठेवून उत्पादन खर्च कमी करण्याचे आणि

नवीन बाजारपेठा शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज–उद्धव एकत्र आल्यानं प्रतिक्रिया

राज ठाकरे व उद्धव ठाकरे गणेशोत्सवात एकत्र दिसल्यावर फडणवीस म्हणाले –

“गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले.

अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहो.”

गणेशोत्सवात उत्सवाच्या आनंदासोबतच राज्यातील सुरक्षा,

जागतिक व्यापार आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रित दर्शनावर फडणवीसांचे विधान चर्चेत आले आहे.

read aslo:https://ajinkyabharat.com/ashwincha-motha-decision-ipl-madhun-nvti/