भुवनेश्वर : ओडिशातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या चार जागांसाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणूक रिंगणातील ३७ पैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नबरंगपूर, बेरहामपूर, कोरापुट आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघांसाठी रिंगणात एकूण ३७ उमेदवार असून, त्यापैकी १७ (४६ टक्के) उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे.
सर्वात श्रीमंत उमेदवार
कालाहंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार मालविका देवी यांची ४१.८९ कोटींची संपत्ती असून, त्या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बेरहामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व्ही. चंद्रशेखर यांची २८.७० कोटी आणि भारतीय विकास परिषदेचे बेरहामपूरचे उमेदवार राजेंद्र दलाबेहरा यांची १०.३० कोटींची संपत्ती आहे.
Related News
Zilla Parishad निवडणूक निकाल 2026: अजितदादांच्या शेवटच्या सभेतील उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठं यश
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
Economic Survey 2026 : आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण, समोर येणार देशाच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अहवाल
देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे आणि आर्थिक धोरणांची दिशा ठरवणारे आर्...
Continue reading
संपुर्ण मुंब्रा हिरवा करण्याचा दावाः जितेंद्र आव्हाडांची पहिली थेट प्रतिक्रिया
मुंबई उपनगरातील महत्त्वपूर्ण शहर मुंब्रा पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्र...
Continue reading
Ajit Pawar Death in Plane Crash: भारताने गमावले एक कुशल आणि जनतेशी जवळचे नेता
महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी 2026 चा जानेवारी महिना अत्यंत दु:खद ठरला आह...
Continue reading
महापालिका निकालांनंतर राजकीय रणधुमाळी
Continue reading
Chhatrapati Sambhajinagar: महापौरपदासाठी भाजपमधील जोरदार लॉबिंग, कोण होणार 23 वा महापौर?
मराठवाड्याची राजधानी Chhatrapati संभाजीनगर महापालिकेत महा...
Continue reading
KDMC Election 2026 : राज ठाकरे यांच्या मनसेचा एक मोठा निर्णय आणि राजकीय उलथापालथ
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्व...
Continue reading
अकोट नगरपालिका मध्ये सभापती व समिती सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. नगरपरिषदेत विविध विषय समिती सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी झाली, जिथे सर्व पदांवर अविरोध...
Continue reading
सर्वात गरीब उमेदवार
कोरापुट येथील एसयूसीआय (सी) पक्षाच्या उमेदवार प्रमिला पुजारी या सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांच्याकडे केवळ २० हजार ६२५ रुपयांची संपत्ती आहे. बेरहामपूर येथील भाजप उमेदवार प्रदीप कुमार पाणिग्रही यांच्याकडे सर्वाधिक ३.८२ कोटींची संपत्ती आहे.
उमेदवारांपैकी दहा म्हणजे २७ टक्के जणांचे वय २५ ते ४० वर्षादरम्यान
– २३ जण म्हणजे ६२ टक्के उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील
– चार जणांचे (११ टक्के) वय ६१ ते ७० वर्षादरम्यान
– सात (१९ टक्के) उमेदवारांचे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले प्रलंबित
– उमेदवारांपैकी १४ म्हणजे ३८ टक्के जणांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावी उत्तीर्ण
– २२ म्हणजे ५९ टक्के उमेदवार पदवीधर, तर एका उमेदवाराने स्वतःला केवळ साक्षर असल्याचे जाहीर
– चौथ्या टप्प्यातील एकूण ३७ पैकी सात उमेदवार महिला