अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी…

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी...

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला…

दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस…

अकोला: अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन्हेगारीचा हैदोस सुरू आहे.

Related News

बुधवारी रात्री पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला

असून भर रस्त्यात बसून रील बनवणाऱ्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

शहरात पोलिसांचा वचक न राहिल्याने रस्त्याच्या मधोमध गाड्या उभे करून केक कापणे,

रिल्स बनविणे असे प्रकार सर्वत्र सर्रास बघायला मिळतात. पत्रकार विठ्ठल महल्ले रात्री आपली ड्युटी आटोपून घरी जात

असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास खडकी परिसरातील डम्पिंग ग्राउंड नजीकच्या रस्त्यावर तीन युवक दारू

पिऊन रील बनवत होते. जायला रस्ता तरी सोडा असे म्हटल्यावरून या बदमाश्यांनी महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

महल्ले यांच्या जवळीलच हेल्मेट हिसकावून घेत त्या हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले.

तिघांचा मुकाबला करत महल्ले यांनी कसेबसे आपले प्राण वाचवले.

पोलिसांना फोन केल्यानंतर आरोपी पळून गेल्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. रेल्वे स्टेशन वरून महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून

नेताना चोरट्याचा पाठलाग करताना पतीला ठेचून मारणाऱ्या चोरट्याचे प्रकरण ताजे असताना शहरात अशा

हाणामारीच्या अनेक घटना घडत असल्याने अकोला पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसल्याचे यावरून दिसत आहे.

पोलीस केवळ हप्ते वसुलीत दंग असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांकडून होणारी पेट्रोलिंग ही नावापुरती होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावरील हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र

बहुजन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई न

केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Related News