Ambarnath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.निनाद करमरकर, अंबरनाथ
Ambarnath News : अंबरनाथच्या शिवगंगा नगरमधील नागरिक मागील अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करत आहेत.
अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात गुरुवारी नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलं.
Related News
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.
शिवगंगा नगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला.
अखेर शिवगंगा नगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पाण्याची ही समस्या 3 ते 4 दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं. याबाबतचं लेखी पत्र रवी पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं.