Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Bijapur Naxalites Encounter: छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये बिजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.
पोलिसांनी चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी 22 नक्षलवाद्यांना ठार केल्याची पुष्टी केली आहे.
Related News
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या फायदे आणि आवश्यक काळजी
केस गळणे, केस तुटणे, केसांची वाढ मंदावणे आणि केस क...
Continue reading
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
Continue reading
FD की म्युच्युअल फंड? 5 वर्षांत 5 लाख रुपयांवर कुठे मिळेल अधिक फायदा; आकडेवारीतून समजून घ्या
आजच्या काळात केवळ पैसे कमावणे पुरेसे नाही, तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणेही तित...
Continue reading
धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांचीही मागणी
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढ...
Continue reading
Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन; दररोज 2GB डेटा आणि Google Gemini AI Proसह अनेक फायदे
Jio : भारतातील टेलिकॉम क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळे रिचार्ज ...
Continue reading
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षच देऊन टाकणार का? देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात बिनतोड सवाल
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीच्या अंति...
Continue reading
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी; लखनऊ हत्याकांडाची Inside Story
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गुरुवारी घडलेल्या तिहेरी मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोम...
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
Continue reading
पॉपकॉर्नला केवळ जंक फूड समजू नका! ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
पॉपकॉर्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर चित्रपटगृह, टीव्हीसमोरचा नि...
Continue reading
CJP आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं; म्हणाले, आधी सत्य समजून घ्या
ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी CJP म्हणजेच कॉक्...
Continue reading
सतत होणारी डोकेदुखी सामान्य समजू नका! ‘ही’ लक्षणे ब्रेन ट्युमरचा इशारा ठरू शकतात
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी ही अत्यंत सामान्य समस्या मानली जाते. कामाचा ताण, अपुरी झोप...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : ‘आमच्याकडे अधिकार आहेत’, शिवसेना खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या आणि बहुचर्च...
Continue reading
तर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात एक डीआरजी सैनिक जखमी झाला आहे.
बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात नक्षलमुक्त भारत अभियान सुरु आहे. संपूर्ण बस्तरमध्ये नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी पोलीस आणि जवान सज्ज आहेत.
गुरुवारी बिजापूर, नारायणपूर, दंतेवाडा, कांकेर जिल्हा आणि सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांवर कारवाईला पोलीस आणि जवानांनी सुरुवात केली आहे.
संभागच्या दोन वेगवेगळ्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर मोठ्या संख्येने जवान बाहेर पडले होते. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे.
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात जवानांनी 20 नक्षलवादी मारले. 18 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
कांकेरमध्येही 4 नक्षलवादी ठार
कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागातही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. इथेही पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे अस्तित्व आहे.
माहिती मिळताच सैनिकांनी केलेल्या कारवाई 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी येथून मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. येथे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, असे मानले जात आहे.