युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा!

मोठ्या

मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रवास

युवराज सिंगचा बायोपिक येत असल्याची घोषणा झाली आहे.

कर्करोगाशी झुंज देऊनही विश्वचषक खेळत भारताला विश्वविजेता

Related News

बनवण्यात मोठी भूमिका बजावली. कॅन्सरवर मात करून क्रिकेटच्या

मैदानात परतलेल्या युवराज सिंगची कहाणी आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होणार आहे.

भूषण कुमार आणि रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.

2011 च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंगला कर्करोग झाला होता आणि

तरीही त्याने हार मानली नाही, तो संपूर्ण विश्वचषक खेळला होता.

त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून

देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला

‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब मिळाला होता.

युवराज सिंगच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा

अद्याप झालेला नाही. युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की,

जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने

साकारावी अशी त्याची इच्छा आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sainath-pardhine-jinkle-bronze-medal-in-under-17-world-wrestling-championship/

Related News