युरिया संकटावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्लाबोल

खत तुटवड्यावर स्वाभिमानींचा संघर्ष

मुर्तीजापूर (जि. अकोला) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते.

खरीप हंगामात वेळेवर खत उपलब्ध न झाल्याने पिकांवर संकट ओढवले होते. या गंभीर प्रश्नाला गांभीर्याने हाताळत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष नितिन पा. गावंडे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी

(एसडीओ)   मुर्तीजापूर  यांना निवेदन सादर केले.यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने खत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

निवेदनानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली व युरियाचा तुटवडा दूर करण्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला यश मिळाल्याचे समाधान शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आले.

या वेळी तालुक्यातील युरियाच्या साठवणीसंदर्भात माहितीपत्रकही प्रशासनाला सादर करण्यात आले.

Read also : https://ajinkyabharat.com/anganat-ghit-pranayashi-jeevavar-hool-hoon-ladhali-came/