मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची आत्महत्या!

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांनी

सुरु केलेल्या उपोषणानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरून

अधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, असे

Related News

असतांना काही तरुण नैराश्यातून थेट आत्महत्या सारखं टोकाचे

पाऊल उचलत आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या

करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने जिल्हा

परिषदेच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या

केल्याची घटना घडली आहे. ही घटनाा बीड जिल्ह्यात घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जुन कवठेकर असं तरुणाचे नाव

आहे. पहाटेच्या दरम्यान या तरुणाने गळफास घेतला. तरुणाच्या

खिशात एक चिठ्ठी देखील सापडली आहे. या चिठ्ठीत सरकार

मराठा समाजाला आरक्षण देत नाही, दिलेला शब्द पाळत नाही.

त्यामुळे मराठा बांधवानी एकजूट व्हावे असे लिहिले आहे.

पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. अर्जुन कवठेकर हा उखंडा

गावचा रहिवासी आहे. तो खासगी बसचा चालक होता. दरम्यान

या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/fire-in-chembur-7-people-from-the-same-family-died-in-the-fire/

Related News