नागपंचमी निमित्त आरती, बाऱ्यांचा कार्यक्रम, भजन आणि महाआरतीस भाविकांची मोठी उपस्थिती
येवता बंदी (ता. कारंजा) येथे श्री सोपीनाथ महाराज नागपंचमी यात्रा महोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी आरतीने प्रारंभ झालेल्या या यात्रेत धानोरा,
यावाडी, उंबडा बाजार, पिंपरी, इंझा, कारंजा येथून आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
बारी मंडळांचा कार्यक्रम सकाळी सात ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरू राहिला.
महाआरतीनंतर उपवास सोडण्यात आला.
स्थानिक दुकानदारांनी यात्रा मंडपात दुकान लावून यात्रेची शोभा वाढविली.
Read Also : https://ajinkyabharat.com/kondoli-yehe-nagdevateche-waru-pujan-mothya-enthusiast/