यंदा पडणार कडाक्याची थंडी!

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून

मान्सून निघून जाईल असा अंदाज मांडला आहे. या वर्षी देशात

Related News

नेहमीपेक्षा ८% जास्त पाऊस झाला. यासह आता यंदाची थंडी

सुद्धा अशीच कडक पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज

वर्तवला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर

आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये कडक थंडीची लाट येणार

असल्याची शक्यता देखील हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

तीव्र उष्णता आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस सहन केल्यानंतर,

भारताला आता यंदाच्या हिवाळ्यात तीव्र थंडीचा सामना करावा

लागू शकतो. ऐन ऑक्टोबरमध्ये एकीकडे नागरिकांना उन्हाच्या

झळा सहन कराव्या लागत आहेत तर दुसरीकडे आता. थंडीची

दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये

ला निनाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याचा

अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की याच

महिन्यांत ला निना प्रभाव सुरु होण्याची शक्यता आहे. आता

थंडीची तीव्रता नेमकी किती असेल याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच

येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर

डिसेंबर आणि जानेवारीत तापमान लक्षणीयरित्या कमी होऊ

शकते. साधारणपणे ला निना इफेक्टमुळे तापमानात घट होते.

ला निना म्हणजे काय ?

ला निनामुळे तापमानात घट होते आणि तापमानात गारवा वाढतो.

ला निना दरम्यान, पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे

ढकलतात आणि समुद्राची पृष्ठभाग थंड करतात. भारतीय

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर

दरम्यान ला निना प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. जेव्हा ला

निना येते, तेव्हा सामान्य तापमानापेक्षा थंडीचा अनुभव जास्त येतो.

एकूणच भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि जागतिक हवामान

संस्थेला ला निनाच्या संभाव्य बदलावर बारकाईने लक्ष ठेवून

आहेत. नोव्हेंबरपर्यंत येऊ घातलेल्या हिवाळ्याच्या तीव्रतेबद्दल

अद्याप तरी स्पष्ट अंदाज उपलब्ध होतील. त्यामुळे तुर्तास ऐन

ऑक्टोबरच्या हिटमध्ये भारतीयांसाठी हिवाळ्याच्या हंगामाची

दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ajitdadas-pro-mlas-controversial-legislation-regarding-women/

Related News