कान्हेरी सरप, 13 मार्च 2025 – कान्हेरी रोडवर एक जखमी सायाळ आढळून आल्यानंतर अकोला वनविभागाने
वेगवान कारवाई करत त्याला जीवदान दिले. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर
आरएफओ विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड, वनरक्षक
संघपाल तायडे यांनी रेस्क्यू टीमचे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे,
तुषार आवारे आणि चालक यशपाल इंगोले यांना घटनास्थळी पाठवले.
बाळ काळणे आणि तुषार आवारे यांनी सायाळला सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात टाकले व
त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उफाळे यांनी त्याच्यावर उपचार केले.
सायाळ हा जमिनीत लपणारा अनोखा वन्यजीव असून त्याचे नख, दात तीव्र असतात
आणि अंगावर दीड ते दोन फूट लांब काटे असतात. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने फोन
करून त्याचा जीव वाचवण्याची विनंती केली, ही वनसंवर्धनाविषयी जागरूकतेची सकारात्मक बाब आहे.
बाळ काळणे यांनी याआधीही अनेक सायाळांना वाचवले असून त्यांच्या वन्यजीव संवर्धन कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सायाळजवळ सहसा कोणताही हिंस्त्र प्राणी जात नाही, त्यामुळे हा प्राणी निसर्गाच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतो.
“जीवसृष्टी संवर्धन हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे,” असे संदेश या घटनेतून मिळत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhuravadicha-jallosh-puneyyatun-13-zada-u200bu200btrain-pan-dhavatya-railways-pahanifuga-takle-tar-mothi/