नागपुरातील नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदू लोकांसाठी आयोजित करण्याची सूचना विश्व हिंदू परिषद (VHP) ने दिली आहे. मुस्लीम तरुणांना प्रवेश न देता, गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासूनच प्रवेश द्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे की, जर कोणताही मुस्लिम तरुण उत्सवात प्रवेश घेतला, तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. बजरंग दल आणि विहिंपचे कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असून, त्यांचा दावा आहे की काही मुस्लिम तरुण गरब्यात लपून सहभागी होतात, त्यामुळे त्यांना प्रवेश देऊ नये.
याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना अधिकृत सूचना देण्यात येणार आहेत आणि आयोजकांना विनंती पत्रही पाठवले जाणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/surekha-yadav-retired-36-years-old/
