खामगाव:-
दि. २२ -राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी कामगार मंत्री
आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात सामान्य रुग्णालय
अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात सुमारे ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराला भाजपा तालुका अध्यक्ष श्याम पाटेखेडे ,
नरेंद्र शिंगोटे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, संजय शिंनगारे, राम मिश्रा, पवन गरड,
महेंद्र रोहणकर, शांताराम बोधे, यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी,
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.
Read Also : https://ajinkyabharat.com/satpudayat-musadhar-pavasacha-kahr-borodil-ghoga-naryala-pur/