महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक पाऊल टाकत ICC प्रमुख जय शाह
यांनी 2025 महिला वर्ल्ड कपसाठी प्राईज मनीत विक्रमी वाढ जाहीर केली आहे.
स्पर्धा 30 सप्टेंबरपासून रंगणार असून एकूण 13.88 मिलियन डॉलर्स
(सुमारे 122 कोटी रुपये) इतकी इनामी रक्कम ठरवण्यात आली आहे.
विजेता संघाला तब्बल 4.48 मिलियन डॉलर्स (40 कोटी रुपये)
उपविजेत्याला 2.24 मिलियन डॉलर्स (20 कोटी रुपये)
सेमीफायनल गाठणाऱ्या संघांना प्रत्येकी 10 कोटी रुपये
पाचवा-सहावा क्रमांक : प्रत्येकी 6 कोटी रुपये
सातवा-आठवा क्रमांक : प्रत्येकी 2.5 कोटी रुपये
प्रत्येक संघाला किमान 2.5 कोटी रुपये हमी
महत्वाची सामने :
30 सप्टेंबर : भारत विरुद्ध श्रीलंका – बंगळुरू
5 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो
12 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विशाखापट्टणम
19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध इंग्लंड – इंदूर
23 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड – गुवाहाटी
26 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश – बंगळुरू
2 नोव्हेंबर : अंतिम सामना – कोलंबो/बंगळुरू
महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आर्थिक बदल मानला
जात असून यामुळे खेळाडूंना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे.