पिंजर प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे
औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी संगीता जाधव यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
कार्यक्रमाचा आयोजन व मान्यवरांची उपस्थिती
जिल्हा परिषद अकोला कर्मचारी भवन येथे हा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी अजित कुंभार
यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम
अधिकारी राजश्री कोलखेडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर आणि डॉ. बिबटे यांचा समावेश होता.
संघटनात्मक कार्य आणि उल्लेखनीय योगदान
संगीता जाधव या महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हक्क व न्यायासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. “संघटना आपल्या दारी”
या संकल्पनेच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील विविध (आयुष्यमान आरोग्य मंदिर) प्राथमिक
आरोग्य केंद्रांना भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य करतात.
आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी गौरव
संगीता जाधव यांनी ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अनेक लढे दिले आहेत.
राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय्य
मागण्यांसाठी जिल्हाभर चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल आरोग्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/daze/