ओडिशा राज्यात महिलांना एका दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’

ओडिशा

ओडिशा सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला

कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे.

Related News

स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंद देणारा हा निर्णय

घेण्यात आला आहे. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी दरम्यान महिलांना

होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून

त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.

हा निर्णय तातडीने लागू झाला असल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले.

हा एक चांगला पायंडा पाडणारा निर्णय आहे. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानताच्या

क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे. या मोहीमेचा उद्देश्य

महिलांसाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण करण्याचा आहे.

महिला आत्मसन्मानाच्या  दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असून

सरकारचा हा  निर्णय जगाला देखील प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओडीशा सरकारच्या या निर्णयाचे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या

संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/wfi-presidents-disturbing-statement/

Related News