ऑगस्टमध्ये अर्ज दाखल केलेल्या लाडक्या बहि‍णींना ‘या’ दिवशी मिळणार पैसे

महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री

माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या

खात्यात दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेला

Related News

सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी

जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

त्यानंतर आता असंख्य महिला ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या

खात्यात कधी पैसे येणार, अशी विचारणा करत आहे. आता राज्याच्या

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली.

सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना

करावा लागला. मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत ही प्रक्रिया

सोपी-सुटसुटीत बनवली. यानंतर असंख्य महिलांनी जुलै महिन्यात हा अर्ज

दाखल केला. या सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3 हजार रुपये

रक्षाबंधनापूर्वी मिळाले. यानंतर आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या

महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात अर्ज

दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये

पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rains-in-gujarat-for-the-third-day-hazeri/

Related News