पातूर : पातूर तालुक्यातील कोसगाव येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण केली. यात पत्नीचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. कोसगाव येथील रहिवासी देविदास श्रीराम डाखोरे (६४) यांनी पत्नी शोभा डाखोरे (६०) हिला गावातील राजेश करवते याच्यासोबत पाहिल्याने संतापून पत्नी व करवते यांना बेदम मारहाण केली. यात शोभा डाखोरे गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर करवते जखमी झाला आहे.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पातूर पोलीस ठाणेदार हणमंत डोपेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akotat-illegal-romance-havoc-republican-party-of-india-magani/
