गुजरात: मुंबईतील वांद्रे येथे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. देशातील कुप्रसिद्ध अशी लॉरेन्स बिश्नाई टीमने त्यांच्या ह्त्येची जबाबदारी घेतली आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येपूर्वी काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खानलाही याच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी देम्यात आली होती. त्यानंतर त्याच्या घराच्या बाहेर गोळीबारही करण्यात आला होता.
पण गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तर लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील प्रत्येक हालचालीवरही बारकाईने लक्ष असते. विशेष म्हणजे साबरमती तुरुंगाच्या लेडी सिंघम आयपीएस अधिकार श्वेता श्रीमाली यांची लॉरेन्स बिश्नोईवर करडी नजर ठेवून आहेत. श्वेता श्रीमाली यांनी 2023 मध्येच साबरमती कारागृहाची कमान हाती घेतली. 2010 मध्ये नागरी सेवेत रूजू झाल्यानंतर त्या आयपीएस म्हणून रूजू झाल्या.
कोण आहेत आयपीएस श्वेता श्रीमाली?
आयपीएस अधिकारी श्वेता श्रीमाली आणि त्यांचे पती सुनील जोशी हे दोघेही गुजरात केडरमधील प्रशासकीय अधिकारी आहेत. श्वेता श्रीमाली या साबरमती मध्यवर्ती कारागृहाच्या डीआयजी आहेत तर त्यांचे पती सुनील जोशी गुजरात एटीएसमध्ये कार्यरत आहेत. या दोघांनी 2010 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्याने भारतातील यूपीएससी परीक्षेत 79 वा क्रमांक पटकावला होता.
आयपीएस श्वेता श्रीमाली या राजपूतांची भूमी असलेल्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. शालेय जीवनापासून श्वेता अभ्यासात खूप हुशार होत्या. एक चांगला आणि मेहनती विद्यार्थी म्हणून त्यांनी पूर्ण झोकून आणि निष्ठेने आपला अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी बीए केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम आणि जिद्दीनंतर त्यांनी या परीक्षेत यश मिळवले.2010 मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत त्यांनी 79 वा क्रमांक मिळवला.
श्वेता श्रीमाली यांनी अहमदाबादमध्ये डीसीपी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना आदिवासीबहुल क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली. त्यात त्यांनी डांग जिल्ह्यात एसपी म्हणून काम केले. आता ती साबरमती मध्यवर्ती कारागृहात डीआयजी म्हणून कार्यरत आहे.