‘पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते’ -संजय राऊत

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Related News

सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला

जात असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान जिथे हात लावतात

त्याची माती होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर

एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.

शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.

पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या

सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने

पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने बनवला होता.

महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना

बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Read also: https://ajinkyabharat.com/seven-people-drowned-in-rain-in-gujarat/

Related News