छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?

मारठ

“मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या

संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.

या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता आहे.

Related News

त्यामुळे आपण आपल्या भेटीसाठी आलो आहे.

आपण या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा”,

असे आपण शरद पवार यांना सांगिल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान सिल्वर ओक

येथे आज सकाळी अचानक दाखल झाले होते.

त्यानंतर प्रसारमाध्यमांतून या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती.

राज्याच्या राजकीय वर्तुळातही या भेटीमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी खुलासा केला.

दरम्यान, भेटीची कोणतीही वेळ न घेता गेल्याने भुजबळ यांना

शरद पवार यांची भेट मिळण्यासाठी जवळपास दीड तास प्रतिक्षा करावी लागली.

प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर ही भेट झाली.

मात्र, नियोजीत दौऱ्यावर निघायचे असल्याने शरद पवार यांच्यासोबत

भुजबळ यांचा संवाद काहीच मिनीटे झाला.

त्यानंतर ते सिल्वर ओकवरुन बाहेर पडले.

या वेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता

त्यांनी संवाद टाळला होता. अखेर त्यांनी आपली भूमिका

आणि भेटीबद्दलची सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.

शरद पवार यांना भेटण्यासाठी मी आज गेलो होतो.

त्यांच्या भेटीची कोणतीही वेळ मी घेतली नव्हती.

फक्त ते घरी असल्याचे मला समजले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती.

ते विश्रांती घेत होते. त्यामुळे मी थोडा वेळ त्यांची वाट पाहात थांबलो.

थोड्या वेळांनी त्यांनी मला बोलावले. मग आमच्यात जवळपास दीड-तास चर्चा झाली.

मी त्यांना सांगितले की, मी राजकारण घेऊन आपल्याकडे आलो नाही.

मंत्री, आमदार, राजकीय नेता म्हणून तर मुळीच नाही.

फक्त मी आलो आहे सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी,

असे आपण पवार यांना सांगितल्याचे भुजबळ या वेळी म्हणाले.

छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना म्हटले की,

राज्यासमोर सध्या सुरु असलेला आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे.

त्यांमुळे हा मुद्दा सोडविण्यासाठी मी कोणासही भेटायला तयार आहे.

अगदी राहुल गांधी यांच्याशीही चर्चा करण्यास आमची तयारी आहे,

असे छगन भुजबळ यांनी म्हटले. मला राजकारण, मंत्रिपद,

आमदारकी हे काहीही महत्त्वाचे वाटत नाही.

माझ्यासाठी समाजातील एकोपा हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/untimely-welcome-to-amravati-to-pandharpur-special-train/

Related News