ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंचा
वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे भारतात कुस्तीचा एक वेगळाच चाहता वर्ग
तयार झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहा कुस्तीपटूंनी
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
पदकासाठी दावा ठोकला होता. पण यापैकी फक्त अमन सहरावतच पदक
मिळवू शकला. दुसरीकडे, विनेश फोगाट 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरली.
तर इतर चार स्पर्धक पदकाच्या शर्यतीतच पोहोचले नाहीत.
कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह नाराज आहेत.
यासाठी त्यांनी देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कारणीभूत धरलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी स्पोर्टक्रीडाला दिलेल्या
मुलाखतीत कांस्य पदक विजेत्या अमन सहरावतचं कौतुक केलं.
पण यावेळी त्यांनी इतर कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून निराशा जाहीर केली.
भारतीय कुस्ती महासंघाला कमीत कमी पाच पदकांची अपेक्षा होती.
संजय सिंह यांच्या मते, कुस्तीपटू चांगल्या पद्धतीने योजना आखत होते,
सर्वकाही ठीक चाललं होतं. पण बृजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या विरोधात
आंदोलन उभं राहिलं. त्यामुळे तयारीला कुठेतरी खीळ बसली. त्यामुळे पदकाची संधी हुकली.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी कोणाचं नाव घेतलं नाही.
पण त्यांचं वक्तव्य विनेश फोगाटकडे इशारा करत असल्याचं दिसत आहे.
विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी इतर कुस्तीपटूंसह जंतरमंतरवर
आंदोलन केलं होतं. संजय सिंह यांच्या दाव्यानुसार यामुळे भारताचं चार पदकांचं नुकसान झालं.
नशीबानेही भारताची साथ दिली नाही, असंही संजय सिंह यांचं म्हणणं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/a-total-of-22-upsc-officials-in-the-country-are-bogus/