वारुळा जिल्हा परिषद शाळेत वर्ग ४ व शिक्षक१!

शिक्षणाचा सुरु आहे बट्ट्याबोळ! शिक्षण विभागाचे दुर्लक्ष!

मुंडगाव:अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग ४ आणि शिक्षक १ असल्याने या शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.या गंभीर बाबीकडे अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.
या बाबतीत वृत्त असे की वारुळा येथील जिल्हा परिषद शाळेत या अगोदर वर्ग ८ व्या पर्यंत शिक्षण मिळतं होते.काही दिवसांने या शाळेतील विद्यार्थी कमी होत गेल्याने या शाळेत वर्ग ७व्या नंतर ६व्या नंतर ५व्या व आता ४थ्या वर्गापर्यंत शाळा असुन जिल्हा परिषद ने या अगोदर वणी येथील जिल्हा परिषद ची शाळा बंद केली होती.त्यामुळे वणी येथील विद्यार्थी हे वारुळा येथे शिक्षणासाठी येत होते.मात्र या शाळेत शिक्षणाचा दर्जा मिळावा या साठी शिक्षकांची निदान आवश्यकता आहे.मात्र येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग ४ असुन या ४वर्गाची जबाबदारी एका शिक्षकांवर येऊन पडली आहे.तसेच या शाळेत एकच शिक्षक असल्याने या शाळेतील सर्व मुख्याध्यापकाची व इतर सर्व कामे या शिक्षकांला करावी लागत आहे.शिक्षक या शाळेतील कामात व्यस्त असल्याने या वर्ग ४पर्यंत च्या विद्यार्थ्यांना केव्हा शिकविणार आहेत.तसेच पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविलेले दुसऱ्या,तिसऱ्या व चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ग्रहण करण्याची वेळ या शाळेत आली आहे.व चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविलेले पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवितात हे समजने कठीण झाले आहे.तरी या शाळेतील या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.तेव्हा या शाळेकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम यांनी लक्ष देऊन या शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा.व या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.

वारुळा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग ४ व शिक्षक १ अशी व्यवस्था असुन या शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.तो थांबवण्यात आला नाही तर नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशन च्या वतीने शिक्षण विभागाचे कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल..
मिनाक्षी इंगळे, छायाताई धोंडेकर, अंतकला जुमळे.नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशन

वारुळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळ मांडला असून येथील शिक्षकांने विद्यार्थ्यांना शिकवावे की मुख्याध्यापकाची व शाळेचे कामे करावे.त्यासाठी या शाळेवर पर्यायी शिक्षक देण्यात यावा.
विद्याताई गावंडे, प्रणाली बिजेकर, वैशाली घनबहादुर,वैशाली वानखडे, नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशन

या शाळेचे नाव हे यादीमध्ये १ शिक्षक दाखवते परंतु येथील शिक्षक ४वर्ग चालवुन इतर कामकाज करतोय त्या जागी पुन्हा नव्याने शिक्षक देण्यात येईल..
श्रीमती माया वानखडे गटविकास अधिकारी अकोट

read also :https://ajinkyabharat.com/supreme-court-dil-mudat/