बाळापूर | प्रतिनिधी – चंदन जंजाळ
वाडेगाव-पातूर रोडवरील ग्रीन पार्क हॉटेलसमोर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन वाहनातील चालकासह
दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना २२ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथून मालेगावकडे जात असलेले एम.एच. २८ ए.झेड. ५५६७ क्रमांकाचे
वाहन जात असताना अचानक रस्त्यावर कुत्रा आडवा आला.
त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने तीन वेळा पलटी घेतली.
अपघातात चालक विलास भोसले (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेल्या महिला
प्रवासी वैशाली देशमुख (वय ३८) गंभीर आणि पदमा वाघमारे (वय ४२) किरकोळ जखमी झाल्या.
अपघातग्रस्तांना उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत एक ऑटो थांबवून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथून प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जीएमसी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या
अपघातांची मालिका सुरूच असल्याने प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chohotta-bazaar-yehe-77-years-shetkyanchi-vishwas-prashan-karoon-suicide/