मुर्तीजापुर /प्रतिनिधी
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या
जीवनावर आधारित नाटिका व पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांना नवचैतन्य देण्याचे कार्य केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज आहे या अनुषंगाने वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.
यामध्ये गुरुजींची भूमिका सोहम गोरले, बाळ गंगाधर टिळकांची विद्यार्थीदशेतील भूमिका मंथन कावरे यांनी साकारली या नाटिकेत पार्थ देशमुख,
प्रणव कावरे, सार्थक गावंडे, अंश भगत, मुकुंद गायकवाड, स्वरूप राठोड इत्यादी विद्यार्थी सहभागी होते.
लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारित असा पोवाडा वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला याची धुरा
सोहम शिंदे आणि आर्या घाटे यांनी सांभाळली असून त्यांना सहकार्य ईश्वरी ठोकळ, आराध्या दिवनाले, आयुशी खांडेकर,
आराध्या गावंडे, सिद्धी राठोड व माही उंबरकर यांनी केली. लोकमान्य टिळकांच्या जीवनपटाला उजाळा देण्याकरिता श्रावणी गावंडे,
वंशिका महानुर, स्वरश्री गावंडे, स्वर्णिका बोंडे, तनिष्का मुंदडा या विद्यार्थीनी भाषणे दिलेत.
लोकमान्य टिळकांच्या प्रौढ अवस्थेची भूमिका देवांश उंबरकर यांनी साकारली.
कार्यक्रमाची संकल्पना प्रिती माटोडे यांची असून सूत्रसंचालन व आभार भारती गायकवाड यांनी मानलेत.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कडू , प्रमुख पाहुणे पर्यवेक्षिका मिनाक्षी महाजन व वंदना भाकरे या होत्या.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/gabbar-tax-opposition-to-akot-city-congresscha-dharana-movement/