रिसोड (वाशिम) – मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर
वटवृक्षांच्या निसर्गरम्य परिसरात स्थापन असलेले
सिद्धिविनायक गणेश मंदिर व्याड नगरीतील प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
रिसोड तालुक्यातील आकराव्या शेतकात स्थापन असलेल्या
या मंदिरात चार फूट उंच दगडावर कोरलेली सिद्धिविनायक गणेशाची मूर्ती आहे.
हे हेमाडपंथी मंदिर असून,
स्थापत्यशास्त्रात प्रावीण्य असलेल्या हेमाद्री नावाच्या वास्तुविशारदाने बनवले आहे.
मंदिरात कुठलाही सिमेंट किंवा चुना वापरलेला नसून,
प्राचीन पद्धतीने कोरलेल्या दगडी शिळा एकमेकांवर ठेवून मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.
मंदिराचे व्यवस्थापन गावातील तरुण वर्ग करत असून,
येथे भाविकांना दर्शनासाठी दर गुरुवार, मंगळवार,
संकट चतुर्थी तसेच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मोठी गर्दी असते.
दर वर्षी भजन-कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन उत्साहाने केले जाते.
या मंदिरामुळे व्याड नगरीला महाराष्ट्रात विशेष ओळख मिळाली आहे.
सिद्धिविनायक गणेश नवसाला पावणारा मानला जातो
आणि भाविक येथे येऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात.
मंदिराचा ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता,
हे स्थान विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते.