कोण उमेदवार पडणार याविषयीची उत्सुकता; मतांची जुळवाजुळव सुरु
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे
Related News
हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत
महायुतीकडून ९ उमेदवार तर महाविकास आघाडीकडून
३ उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने
आता महायुतीचा उमेदवार पडणार की महाविकास आघाडीचा
याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
भाजपकडे अपक्षांसह ११२ मते आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता
११५ मतांची आवश्यकता असून, भाजपने पुरेसे संख्याबळ जमविल्याचे सांगण्यात येते.
शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवजी पुरेशी मते आहेत.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी
मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील
यांच्याकडे पुरेशी मते नाहीत.
या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत.
एकूण रागरंग बघता शेकापचे जयंत पाटील यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान असेल.
विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे.
महायुतीने आपले नऊही उमेदवार निवडून आणण्याकरिता
परस्परांमध्ये मतांची योग्य अशी वाटणी केली आहे.
दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतांचे नियोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसचे ३७ आमदार असले तरी पाच ते सहा आमदारांच्या मतांबाबत
पक्षाचे नेते साशंक आहेत. यामुळेच पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना
२८ ते ३० मते दिली जाणार आहेत.
पक्षाची अन्य मते ही शिवसेनेचे नार्वेकर यांना दिली जाणार आहेत.
काँग्रेसची अतिरिक्त मते व काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे मिलिंद नार्वेकर
यांना २३ मतांचा पल्ला गाठणे शक्य होईल, अशी चिन्हे आहेत.
सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते.
सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांसाठी स्नेहभोजन ठेवले आहे.
त्यात मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन केले जाईल.
प्रत्यक्ष मतदान कोणाला करायचे याची चिठ्ठी शुक्रवारी सकाळीच दिली जाईल.
मिलिंद नार्वेकर व शेकापचे जयंत पाटील हे दोघेही ताकदवान उमेदवार रिंगणात असल्याने
घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जाते.
अजित पवार गटातील आमदारांची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्यास
राष्ट्रवादीचा उमदेवार अडचणीत येऊ शकतो.
विधान परिषद निवडणुकीत आपापले उमेदवार निवडून आणताना
आपले आमदार फुटू नयेत, दुसऱ्या पक्षांच्या गळाला लागू नयेत
यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना
पंचतारांकित हॉटेलच्या चिरेबंदी वाड्यात मुक्कामाला ठेवले असले.
मैदानात कोण कोण?
भाजप-पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवाजीराव गर्ने आणि राजेश विटेकर
शिवसेना-कृपाल तुमाने आणि भावना गवळी
ठाकरे गट-मिलिंद नार्वेकर
काँग्रेस-प्रज्ञा सातव
शरद पवार गट पुस्कृत उमेदवार जयंत पाटील (शेकाप)
Read also: https://ajinkyabharat.com/yavi-to-compensate-for-the-damage-caused-by-rain/