लोकसभा निकालापाठोपाठ आणि महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर
निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांकरिता
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
निवडणुकीची घोषणा केली आहे.
येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी 11 जागांसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
विधान परिषदेच्या मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप),
निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट),
अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस),
रामराव पाटील (भाजप), प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप),
जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे.
कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
25 जून – अधिसूचना जारी
2 जुलै – अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै – अर्ज छाणणी
5 जुलै – अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै – मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै – मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता)
Read also: छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार!! (ajinkyabharat.com)