वीजांचा कडकडाट आणि ढगाळ आकाश; अमरावतीत लँडिंग अपूर्ण राहिले

अमरावतीकरांची आशा पुन्हा हवेतच विरली…

काळेकुट्ट ढग, प्रचंड वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अमरावतीकरांची आशा पुन्हा एकदा हवेतच विरली…

सोमवार, १५ सप्टेंबर रोजी मुंबईहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर येणारे विमान हवामानाच्या अडथळ्यामुळे आकाशातच फिरून परत मुंबईला रवाना झाले.त्यामुळे अमरावतीत उतरण्याची आस धरून बसलेले प्रवासी परत मुंबईला जावे लागले, तर अमरावतीतून मुंबईकडे जाणारे प्रवासी आकाशाकडेच नजर लावून राहिले.संध्याकाळी अचानक हवामान ढगाळ झाले, वीजांचा कडकडाट सुरू झाला आणि एटीसीने उतरण्याची परवानगी नाकारली. रात्रीची लँडिंग सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचा प्रवास हवेतूनच अपूर्ण राहिला.आणि शेवटी, अमरावतीत उतरण्याची वाट पाहणारे प्रवासी फक्त आकाशाकडे पाहतच राहिले… आणि विमान मुंबईकडे निघून गेले !

read also : https://ajinkyabharat.com/banjara-samajachi-constitutional-magani-morchalis-attended-thousands-of-attendance/