कारंजा : क्रिडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रिडा परिषद,
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रिडा कार्यालय कारंजा यांच्या
संयुक्त विद्यमाने तालुका क्रिडा संकुल येथे आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेत
विवेकानंद हिन्दी हायस्कुल, कारंजा येथील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर मजल मारली आहे.
१४ वर्ष वयोगटातील ३५ किलो वजन गटात अली शकील गारवे
तर १७ वर्ष वयोगटातील ४८ किलो वजन गटात समशेर शब्बीर पप्पुवाले
यांनी दमदार खेळ करत जिल्हा स्तरावर प्रवेश मिळविला.
या यशामागे प्रशिक्षक तौफीक हसन पटेल व महेबुब गारवे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच मुख्याध्यापक रशिद चौधरी व शिक्षक मनोज शिवाल,
चंदा राठोड, रामेश्वर काजे, हसन जानीवाले यांचे सहकार्यही महत्त्वाचे ठरले.
शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे
Read also : https://ajinkyabharat.com/sri-shivaji-college-plantation-under-the-undertaking-of-a-tree-mother/