सांगली जिल्ह्यातील विटा शहरात धक्कादायक अपघात घडला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका दुचाकी गाडीला डंपरने जोरदार धडका दिला,
ज्यामुळे ६२ वर्षांच्या प्रमिला तांबे यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या
रुग्णालयात नेण्यात आले आहे.
अपघातानंतर नागरिकांनी डंपर चालकास पकडून तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदार कोण, हे शोधण्यात येत आहे.
या घटनेमुळे विटा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/beidamidhye-bepatta-home-guard-mahilecha-deaddeh-nalyat-sapadla/
