मागाठाण्यात शिंदे गटाला मोठा धक्का; शाखाप्रमुख येरुणकर भाजपमध्ये
मागाठाणे : राज्यातील महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांना मागाठाण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे
यांचे निकटवर्तीय आणि वार्ड क्र. ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले येरुणकर यांनी आमदार सुर्वे यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे.
मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा हाती घेतला.
सोलापुरानंतर आता मागाठाण्यातही धक्का
गेल्या आठवड्यात सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता. अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे
दिल्यानंतर आता मागाठाण्यातील येरुणकर यांचा भाजप प्रवेश शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
महापालिका रणतयारीला वेग
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
महायुतीकडून निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी महाविकास आघाडीमध्ये अद्याप स्पष्टता नाही.
अशातच शिंदे गटातील कार्यकर्त्यांचे पक्षांतर हे निवडणुकीच्या समीकरणावर परिणाम करणारे ठरू शकते.
Read also :https://ajinkyabharat.com/vande-mataram-express-akola-madhe-jangi-welcome/