पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली

नवी तारीख

नवी तारीख लवकरच होणार जाहीर

25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने

स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं.

Related News

अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी

आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे.

एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख

लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे.

पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये

रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ ही परीक्षा २५ ऑगस्टला

आयोजित केली होती. या परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याची मागणी

विद्यार्थ्यांची आहे. एमपीएससी आणि आयबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी

घेण्यात येणार होत्या. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी

विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी

पुण्यात आंदोलन करत होते. चार दिवसांवर परीक्षा असताना अभ्यास सोडून

विद्यार्थी पावसात आंदोलनाला बसले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं.

Read also: https://ajinkyabharat.com/yuvraj-singh-biopic-announced/

Related News