मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार!

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे.

जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा

मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिरीबाम येथे आज

Related News

सकाळी (7 सप्टेंबर) ताज्या हिंसाचारात 5 लोकांचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, एका व्यक्तीची झोपलेला

असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन सशस्त्र विरोधी

गटांनी परस्परांवर गोळ्या चालवल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी जिल्ह्या मुख्यालयापासून

5 किमी अंतरावर एका निर्जन स्थळी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीची

घरात घुसून हत्या केली. त्यावेळी तो झोपलेला होता. या हत्येनंतर

7 किलोमीटर दूर डोंगरांमध्ये सशस्त्र गटात जोरदार गोळीबार झाला.

यात 4 जणांचा मृत्यू झाला.

या आठवड्याच्या सुरुवातीला जाळपोळीची सुद्धा घटना घडली होती.

काही लोकांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच रिकामी असलेलं 3 खोल्यांच

घर जाळलं होतं. 1 ऑगस्टला आसाच्या कछारमध्ये CRPF च्या

देखरेखीखाली एक बैठक झाली. दोन वेगवेगळ्या समुदायाच्या

प्रतिनिधींनी सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी जाळपोळ,

गोळीबार रोखण्यासाठी करार केला. त्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार झालाय.

Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-family-lalbaugcha-rajas-darshanala/

Related News