विनेश फोगटला देणार गोल्डमेडल

विनेश फोगट

हरियाणात होणार जल्लोषात स्वागत

विनेश फोगट आपल्याला रौप्यपदक मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे.

पण रौप्यपदकाची प्रतिक्षा असताना आता विनेश फोगटला

Related News

सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रौप्यपदकासाठी विनेशने याचिका दाखल केली होती.

यानंतर आता विनेशला सुवर्णपदक देण्यात येणार असल्याचे आता समोर आले आहे.

विनेश फोगट तर फायनलला पोहोचली होती.

पण त्यापूर्वी तिचे वजन वाढले आणि तिला फायनल खेळता आली नाही.

जर विनेश फायनल खेळली असती तर तिचा फॉर्म पाहता

तिला सुवर्णपदकही पटकावता आले असते. पण वजन वाढल्यामुळे

ती फायनल खेळण्यास अपात्र ठरली. त्यामुळे विनेशने क्रीडा लवादाकडे

आपल्याला रौप्यपदक तरी दिले जावे, अशी मागणी केली होती.

या याचिकेवर भारताकडून युक्तीवादही करण्यात आला.

त्यानंतर क्रीडा लवादाने विनेश फोगटला तीन प्रश्न विचारले आहेत.

याबाबतचा ईमेल हा विनेश फोगटला करण्यात आलेला आहे.

विनेश फोगटचा संघर्ष तिच्या गावच्या लोकांनी पाहिला आहे.

विनेश एक गुणवान खेळाडू असून तिची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये

दमदार कामगिरी होत होती. पण फक्त एका तांत्रिक गोष्टीमुळे तिचे पदक हुकले.

पण विनेशचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हुकले असले तरी तिला

आम्ही गोल्ड मेडल देणार आहोत, असा निर्णय आता हरियाणातील आता

सर्वखाप पंचायतीने केला आहे. ट्विटरवर त्यांनी माहिती दिली आहे की,

” सर्वखाप पंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

विनेश फोगट जेव्हा भारतात येईल तेव्हा तिचे भव्य स्वागत आम्ही करणार आहोत.

विनेशसाठी एक खास कार्यक्रमाचे आयोजन आमच्यावतीने

करण्यात येणार आहे. या खास कार्यक्रमात विनेशला गोल्डमेडल

देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.” विनेशला ऑलिम्पिकमध्ये

गोल्ड मेडल मिळणार नसले तरी तिला हरियाणातील पंचायत

सुवर्णपदकाने सन्मानित करणार आहे. विनेश फोगट सध्याच्या घडीला

पॅरिसमध्ये एका महत्वाच्या कामात गुंतलेली असेल.

कारण विनेशला क्रीडा लवादाने तीन प्रश्न विचारले आहेत आणि

तिन्ही प्रश्नांची उत्तरं तिला द्यायची आहेत. या उत्तरांनंतरच तिच्या याचिकेवर

निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता विनेश नेमकी काय उत्तरे देते,

याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Read: https://ajinkyabharat.com/construction-of-bhidewada-national-memorial-will-start-soon/

Related News