दहिगाव गावंडे :आरोळी सामाजिक संस्थेच्या वतीने ग्राम वणी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला बोरगाव मंजू येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख, सेवानिवृत्त श्रीकृष्ण कुकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच कानशिवणी येथील प्रवीण वाहूवाघ यांचीही विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एकता ज्येष्ठ नागरिक संघाचे भिमराव खंडारे आणि आरोळीचे समाधान वानखडे यांनी वृक्ष देऊन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान वानखडे यांनी केले तर अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकृष्ण कुकडे यांनी सांभाळली.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. त्यावर उत्तर देताना कुकडे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे अनेक प्रश्न सोडवले याचे अनुभव कथन केले.
आरोळी सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत आभार मानले.
समाधान वानखडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठांची काळजी व देखभाल करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून चर्चासत्राची सांगता झाली.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/jilha-parishad-shahetil-vidyarthayana-pen-pencil-watp/