विकास दिव्यकीर्ति यांच्याकडून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर

दिल्ली कोचिंग

दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटना.. 

गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील

राव यांच्या आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात सुरू असलेल्या

Related News

बेकायदेशीर लायब्ररीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

याशिवाय, काही दिवसांपूर्वी पटेल नगर परिसरात आणखी एका विद्यार्थ्याचा

विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी

रस्त्यावर उतरून कोचिंग सेंटरसमोर निदर्शने केली.

यादरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरचे संस्थापक

विकास दिव्यकीर्ती आणि अवध ओझा सरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी मीडियासमोर आपले मत मांडले.

दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी

10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

जुने राजेंद्र नगर आणि पटेल नगर येथे घडलेल्या दोन घटनांबद्दल

दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी शोक व्यक्त केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sharad-pawar-uddhav-thackeray-fadnaviss-car-broken-prakash-ambedkar/

Related News