विजय पजई यांची श्रीहरीकोट्टा अंतरिक्ष केंद्र अभ्यासदौऱ्यासाठी निवड

बोरगावचा अभिमान! पजई श्रीहरीकोट्टाकडे

राष्ट्रीय अंतरिक्ष दिनातील वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी मांडणीबद्दल गौरव

बोरगाव मंजू- भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

. त्यानिमित्ताने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली

आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला, विज्ञान अध्यापक मंडळ अकोला

व कुतूहल संस्कार केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यातील

बाल शिवाजी माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात “आर्यभट्ट ते गगनयान – पुरातन ज्ञान ते अनंत शक्यता” या विषयावर

आधारित शिक्षक गटातील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथील राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त

विज्ञान शिक्षक विजय यशवंत पजई यांनी ऐतिहासिक उपग्रह आर्यभट्टपासून ते चंद्रयान-3 आणि

आगामी गगनयान मोहिमेपर्यंतच्या वैज्ञानिक प्रगतीचे सविस्तर विश्लेषण केले.

परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अचूक आणि वैज्ञानिक

उत्तरे दिल्याने त्यांच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली.

त्यामुळेच त्यांची निवड सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरीकोट्टा येथे अभ्यासदौऱ्यासाठी झाली आहे.

या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (माध्यमिक-नियोजन) संजयकुमार झापे,

विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, राज्य विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. राजकुमार अवसरे,

कुतूहल केंद्र अध्यक्ष नितीन ओक, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष डॉ. रवींद्र भास्कर,

तसेच चौथे उपस्थित होते. यावेळी विजय पजई यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विजय पजई यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मनोज आगरकर, उपमुख्याध्यापक जी. टी. पोहनकर,

पर्यवेक्षक एस. एच. भदे, संस्था अध्यक्ष किरणराव नाईक, दीपकराव नाईक,

डॉ. प्रथमेश नाईक, एन. एस. गमे, के. एम. जोशी, एस. जी. बोरगावकर,

शाम देशमुख, अतुल  नाईक आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

read also: https://ajinkyabharat.com/kamba-khurd-shivarat-van-department-dhadak-pahani/