झारखंडमध्ये हॉकीच्या सामन्या दरम्यान कोसळली वीज

झारखंड

3 खेळाडूंचा मृत्यू, 5 जखमी

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात बुधवारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेत 3 खेळाडूंना आपले प्राण गमवावे लागले आहे.

Related News

तर 5 खेळाडू गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार हे खेळाडू हॉकी सामन्यसाठी सराव करत होते.

मात्र वीज पडून त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

कोळीबिरा येथील तुतिकेल पंचायतीच्या जपला आरसी शाळेच्या

मैदानात खेळाडू हॉकीचा सामना खेळण्याच्या तयारीत होते.

त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट झाला.

खेळाडू मैदानात उभे होते आणि सामना सुरु होणार होता.

बाकीचे लोक पावसापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे गेले.

दुखापतग्रस्त खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,

मृत पावलेल्या खेळाडूंचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

झारखंडच्या सिमडेगाला हॉकीची नर्सरी म्हटले जाते.

येथून अनेक राष्ट्रीय खेळाडू उदयास आले आहेत.

यामध्ये सिल्व्हानस डुंगडुंग, ऑलिम्पियन विमल बॉय, सामुराई टेटे,

सलीमा टेटे अशा अनेक मोठ्या हॉकीपटूंचा समावेश आहे

दरम्यान या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे.

अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे.

झारखंडच्या हॉकी श्रेत्रात देखील या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

दरम्यान उत्तर भारतात अद्यापही अनेक राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून

लोकांना यामुळे मात्र मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/dharamveer-2-new-release-date-announced/

Related News