पातूर : जागतिक अवयव दान दिनानिमित्त पातूर येथील सौ. वंदनाताई जगन्नाथ ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी अवयव दाखवून त्यांची माहिती देण्यात आली.
अवयव दानाचे महत्त्व व त्यातून होणारे योगदान याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय भुस्कडे यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, प्राचार्य चंद्रमणी धाडसे, विज्ञान शिक्षक हरीष सौंदळे,
इकरा आबेदा आदी उपस्थित होते. तर आयुर्वेदिक महाविद्यालयाकडून डॉ. रूपाली शेळके आणि डॉ. नबील शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी “अवयव दान ही महत्त्वाची सामाजिक जबाबदारी” असल्याचा संदेश आत्मसात केला.
Read also : https://ajinkyabharat.com/mala-nobel-dya-naheetar-turiff-lavel/