विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या चैतन्यानंद याला धक्का

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या चैतन्यानंद याला धक्का

 अटकपूर्व जामीन फेटाळला

 आर्थिक अनियमितता आणि फसवणूक प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या कोर्टाने फेटाळला आहे. विद्यार्थिनींशी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या चैतन्यानंद उर्फ पार्थ सारथी याला न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.श्री शारदा संस्थान ट्रस्ट आणि शृंगेरी मठाने आरोपीवर आर्थिक अनियमितता, संपत्तीचा गैरवापर आणि फसवणूक करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की या प्रकरणाची गंभीरता पाहता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य ठरणार नाही.शृंगेरी पीठाने चैतन्यानंदवर बनावटगिरी, तोतयागिरी, फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताचे आरोप लावले आहेत. आरोपीने संस्थेशी संबंधित २० कोटी रुपयांची संपत्ती आणि उत्पन्न गहाळ केल्याचा आरोप आहे. ही माहिती डिसेंबर २०२४ मध्ये एका ऑडीटमध्ये उघडकीस आली होती. तपासात असे समोर आले की साल २०१० मध्ये बाबाने श्री शारदा इंडियन मॅनेजमेंट रिसर्च फाऊंडेशन ट्रस्ट नावाने नवीन ट्रस्ट स्थापन केला, परंतु आधीच अस्तित्वात असलेल्या मान्यता प्राप्त ट्रस्टच्या सर्व कमाई व महसूलाचा वापर या नव्या ट्रस्टद्वारे केला गेला.

बँक खाती आणि एफडी गोठवली
दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बाबाशी संबंधित १८ बँक खाती आणि २८ एफडी गोठवली आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ८ कोटी रुपये जमा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या मते, ही रक्कम आरोपीने बनवलेल्या ट्रस्टद्वारे गैरवापरासाठी तयार केली होती.

विद्यार्थिनींच्या तक्रारी उघडकीस
सामाजिक माध्यम आणि तक्रारींमधून समोर आले आहे की चैतन्यानंद बाबा आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवून लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. संस्थेतील काही महिला वॉर्डनही यास मदत करत असल्याचे उघड झाले. साल २०१६ मध्ये डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात बाबाविरुद्ध केस दाखल झाली होती, परंतु पैशाच्या जोरावर त्याला यापूर्वी वाचवले गेले होते.कोर्टाच्या या निर्णयानंतर प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली असून, आरोपीवरील तपास आता अजून कडक केली जाणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/72-daruchaya-batalya-seized/