विद्रुपा नदीतील पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कमी उंचीच्या पुलाने घेतला पहिला बळी

विद्रुपा नदीतील पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कमी उंचीच्या पुलाने घेतला पहिला बळी

विद्रुपा नदीतील पुरात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कमी उंचीच्या पुलाने घेतला पहिला बळी

बार्शीटाकळी (अकोला) : तालुक्यातील चोहोगाव येथील शेतकरी गंगाधर नारायण गालट (६४) यांचा विद्रुपा नदीला आलेल्या

पुरात वाहून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.

८ ऑगस्ट रोजी सकाळी ते सायखेड येथे शेतीसाठी मजूर शोधायला गेले होते.

परत जाताना चोहोगाव-सायखेडदरम्यान असलेल्या विद्रुपा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते.

पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करताना ते पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले.

संध्याकाळपर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नदी परिसरात शोध घेताना पुलापासून काही अंतरावर झाडाझुडपात अडकलेला त्यांचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.

ग्रामस्थांचा संताप – पुलाची उंची वाढविण्याची मागणी रखडली

चोहोगाव आणि सायखेड दरम्यानच्या विद्रुपा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली होती.

मात्र केवळ सिमेंट पाईप टाकून कमी उंचीचा अरुंद पूल उभारण्यात आला. परिणामी, पावसाळ्यात नदीला आलेले पाणी पुलावरून वाहते आणि गावांचा संपर्क तुटतो.

७ ऑगस्टच्या रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर ८ ऑगस्ट रोजी सकाळी नदीला आलेल्या पुरामुळे हेच घडले.

याच कमी उंचीच्या पुलामुळे शेतकरी गंगाधर गालट यांचा जीव गेला असून हा पुलाने घेतलेला पहिला बळी असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुलाची उंची तातडीने वाढविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/nayagavamadhyaye-alpaviyin-bangladeshi-mulichi-sutka-donashe-vaan-aancharacha-thararak-ulagada/